आत्ता या योजनेच्या माध्यमातून मिळणार 12 ,000 रुपये वार्षिक अनुदान
नमस्कार मित्रांनो , शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे , मित्रांनो बातमी अशी आहे आता शेतकरी मित्राला वर्षाकाठी 12 हजार रुपये असं वार्षिक अनुदान मिळणार आहे. हे अनुदान कशातून व कशाप्रकारे मिळणार आहे याची माहिती आपण पुढे पाहूया. मित्रांनो काही दिवसांपूर्वीच एक नवीन जीआर आला तो जीआर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा होता . मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून आता तुम्हाला वर्षाकाठी सहा हजार रुपये असं अनुदान मिळणार आहे.
नमो शेतकरी महासन्माननिधी योजना ही पी एम किसान योजनेवरच अवलंबून आहे व त्यातील पूर्ण प्रक्रिया हे पी एम किसान योजनेसारखीच आहे. जे शेतकरी मित्र पी एम किसान योजनेसाठी पात्र आहेत तेच शेतकरी मित्र नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी ही पात्र असतील. पी एम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकरी मित्रांना वर्षाला सहा हजार रुपये अनुदान मिळते , सहा हजार रुपये अनुदान हे तीन टप्प्यांमध्ये मिळते. हा टप्पा प्रत्येकी दोन हजार रुपये असा असतो. मित्रांनो यावरच अवलंबून म्हणजे नमो शेतकरी महासनमाना निधी योजना आहे .
आता नमो शेतकरी महासामान्य योजनेच्या माध्यमातून सुद्धा सहा हजार रुपये वर्षाकाठी अनुदान मिळणार आहे . जे शेतकरी मित्र पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना सुद्धा नमो शेतकरी महासंघ निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आता पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून सहा – सहा हजार रुपये असे मिळून वर्षाला बारा हजार रुपये अनुदान शेतकरी मित्रांना मिळणार आहे. ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
चला तर मित्रांनो पुढे पाहूया योजनेच्या माध्यमातून आपल्याला अनुदान कधी मिळणार आहे तर ,
एप्रिल ते जुलै 2000
ऑगस्ट ते नोव्हेंबर 2000
डिसेंबर ते मार्च 2000
अशा पद्धतीने आपल्याला नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून अनुदान मिळणार आहे.