नमो शेतकरी महा सम्मान निधि योजना २०२३
नमस्कार मित्रांनो , शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. मित्रांनो जशी पी एम किसान योजना शेतकऱ्यांच्या मदतीला होती आणि सध्याची आहे तशीच मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून एक योजना चालू करण्यात आलेली आहे तिचे नाव नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना आहे .
मित्रांनो ज्या प्रकारे पीएम किसान योजनेच्या मार्फत वर्षाकाठी शेतकरी मित्राला 6 हजार रुपये अनुदान देण्यात येते तसेच अनुदान आता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या मार्फत शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.
मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवीनच चालू झालेली योजना आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे. मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी सहा हजार रुपये अनुदान मिळणार आहे . आणि मित्रांनो दर चार महिन्याला दोन हजार रुपये अशाप्रकारे मिळणार आहे. मित्रांनो ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.
चला तर मित्रांनो पुढे पाहूया या महिन्याचा निधी कधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे तर .
मित्रांनो योजनेचा पहिला हप्ता हा एप्रिल ते जुलै या महिन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.
मित्रांनो दुसरा हप्ता हा ऑगस्ट नोव्हेंबर मध्ये या महिन्यांच्या मध्ये जमा होणार आहे.
तिसरा हप्ता हा डिसेंबर महिना ते मार्च महिना यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित केला जाणार आहे.
तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे धन्यवाद !