ई पीक पाहणी नोंदणी कशी करावी
नमस्कार मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मित्रांनो जर आता शेतकरी बांधवांना आपल्या राज्यामध्ये सातबारावर पिकाची नोंद करायची असली तर यासाठी ऑनलाईन पद्धतीने पीक पाहणी ही करता येणार आहे. या आधी जर आपल्याला पिकांची नोंद करायची असली तर आपल्याला तलाठी कडे जावे लागत होते आणि यांच्याकडे जाऊन सातबारावर पिकाची नोंद करावी लागत होती पण आता मात्र हे बदललं आहे आणि आता ऑनलाईन पद्धतीने पिकाची नोंद होणार आहे, मागील दोन वर्षापासून ही पिक पाहणी चालू आहे , आता शेतकरी मित्रांना स्वतःच्या पिकाची नोंद करावी लागणार आहे.
नुकतेच सगळीकडे पावसाचे जोरदार आगमन झालेले आहे आणि शेतकरी राजाने त्यांची शेती पेरली आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये पेरणी पर्यंतचे काम आटोपले आहे, यानुसारच आता राज्यांमध्ये ही पीक पाहणी सुरू करण्यात आलेली आहे, ही प्रक्रिया आता चालू झालेली आहे याच्या माध्यमातून आपल्या पिकाची नोंदणी होणार आहे.
खरीप हंगाम 2023 या वर्षाची ई पिक पाहणी करण्यासाठी आता तुम्हाला तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची काहीच गरज नाही कारण आता तुम्ही स्वतः ती ऑनलाईन पद्धतीने करू शकता.
मित्रांनो यासाठी आपल्याकडे एक ॲप असणे गरजेचे आहे.
शेतातील पीक पाहणी कशाप्रकारे करावी ?
मित्रांनो सध्या बहुतांश भागामध्ये एक पेरणी पूर्ण प्रकारे झालेली आहे कारण मेघा राजाचे आगमन झालेले आहे तर आताच ई पीक पाहण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. दोन वर्षा आधीपासूनच ही पीक पाहणी ही आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करता येते पण काही मित्रांना याबद्दल माहिती नाही त्यासाठी आपण यावर चर्चा करणार आहोत. आता राज्यभरातील शेतकरी खरीप आणि रब्बी हंगामातील पिकाची नोंदणी ही आपल्या पद्धतीने मोबाईलवर करू शकतात. मित्रांनो आता स्वतः आपल्याला ई पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करू शकता .
आता प्रश्न राहिला ज्या भागामध्ये इंटरनेट सेवा नाहीत अशा भागातील नागरिकांचा तर यासाठी ऑनलाईन पद्धतीने ई पीक पाहणी संपल्यावर तरीही तीस दिवसापर्यंत गावातील तलाठी यांच्याद्वारे पीक पाहणी करता येते.